'आम्हालाही आत्महत्या करावी वाटते'

'आम्हालाही आत्महत्या करावी वाटते'

माझ्या पतीने 20 वर्षांपूर्वी आत्महत्या केली...आज घरं कसं चालवतोय ते आम्हालाच माहीत...आम्हालाही आत्महत्या करावी वाटते...हा आक्रोश आहे बळीराजाच्या विधवा पत्नींचा...

  • Share this:

30 मार्च : "आमचं कर्ज माफ झालं नाही. पतीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली...मला दोन मुलं आहे...शाळेत कसं टाकू...?, "माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली...आता सासू-सासरेपण काही साथ देत नाही...माझा एक तीन वर्षांचा मुलगा आहे...आता मी काय करू ?", "माझ्या पतीने 20 वर्षांपूर्वी आत्महत्या केली...आज घरं कसं चालवतोय ते आम्हालाच माहीत...आम्हालाही आत्महत्या करावी वाटते...हा आक्रोश आहे बळीराजाच्या विधवा पत्नींचा...

राज्य सरकारनं पीक विम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. औरंगाबादमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा रस्त्यावर उतरल्या. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी शेतकरी महिलांचा आक्रोश हा ह्रदय पिळवटून टाकणारा होता.  आता हा आदेश सरकारनं मागे घेतला खरा तोपर्यंत अनेक ठिकाणी या आदेशाची होळी करण्यात आली.

औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या विधवा महिलांनी या आदेशाची होळी करुन, आपल्या व्यथा आयबीएन लोकमतकडे मांडली. एका शेतकरी महिलेनं आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. आणि जमलेल्या सर्व महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. उपस्थित असलेले माजी मंत्री अब्दूल सत्तार याच्याही डोळ्यात पाणी आलं. ही लढाई अशीच सुरू राहणार असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

First published: March 30, 2017, 10:04 PM IST

ताज्या बातम्या