पाच किलो पेक्षा जास्त बनावट सोनं बँकेत ठेवलं तारण, रॅकेटचा असा झाला पर्दाफाश

पाच किलो पेक्षा जास्त बनावट सोनं बँकेत ठेवलं तारण, रॅकेटचा असा झाला पर्दाफाश

बनावट सोनं, खरं भासवून ते बँकेत तारण ठेऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

  • Share this:

सचिन जिरे (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 24 जानेवारी: बनावट सोनं, खरं भासवून ते बँकेत तारण ठेऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून वेगवेगळ्या बँकेची फसवणूक करणारी टोळीला गजाआड केले आहे.

पाच किलो सोनं बँकेत ठेवले होते तारण..

आरोपींनी वेगवेगळ्या बँकेत तब्बल पाच किलो सोनं तारण ठेवून कर्ज घेतले होते. औरंगाबाद गुन्हे शाखेने या रॅकेटचा भंडाफोड करून बनावट सोनं जप्त केलं असल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) मधुकर सावंत यांनी दिली आहे. या प्रकरणी जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शरद शहाने, सचिन शहाने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात आणखी कोण सोनार बँकेचा व्हॅल्युवर आहे व तो बनावट सोन्याला खरं असल्याचे प्रमाणित करून बँकेतून कर्ज घेऊन देण्यास मदत करत आहे काय? याबाबत आरोपींना विश्वासात घेऊन विचारले असता महाराष्ट्र ग्रामीण बँक व नगर अर्बन को.ऑप. बँक येथे काही लोकांनी या प्रकारे बनावट सोनं तारण ठेऊन कर्ज घेतल्याची माहिती समोर आली. या बँकांमध्ये गोल्ड व्हॅल्युवर कोण आहे, याबाबत चौकशी करण्यात आली. काही लोकांची नावे समोर आलीत. त्यापैकी रमेश गंगाधर उदावंत यांची चौकशी केली असता त्यांनी अडखळत उत्तरे दिली. त्यावरून पोलिसांचा संशय आणखी बळावला. चौकशीतून गंगाधर नाथराव मुंढे, मंगेश नाथराव मुंढे ल दिंगाबर गंगाधर मुंढे यांनी रमेश गंगाधर उदावंत यांना धमकावून व कुटुंबाना जिवे मारण्याची धमकी देऊन बनावट सोनं खरं असल्याचे प्रमाणित करुन बँकेतून कर्ज मिळवले. नंतर सदर नगर अर्बन को.ऑप. बँकेचे व्यवस्थापक मंगेश कर्डीले यांनी गंगाघर मुंढे, मंगेश नाथराव मुंढे ल दिंगाबर गंगाधर मुंढे यांनी यांनी बँकेत तारण ठेवलेल्या सोन्याची दुसऱ्या गोल्ड व्हॅल्युवरकडून तपासणी केली असता ते 100 टक्के बनावट असल्याचे आढळून आले. नगर अर्बन को.ऑप. बँकेच्या खडकेश्वर शाखेत तारण ठेवलेले 2590 ग्रॅम सोनं बनावट असल्याचं निष्पन्न झालं. त्याचप्रमाणे गंगाधर मुंढे आणि मंगेश मुंढे यांनी महाराष्ट्र ग्राणीण बॅंकेच्या समर्थनगर शाळेत ठेवलेले 2609 ग्रॅम सोनं देखील बनावट असल्याचे समोर आले. याप्रकरणी दोन्ही बॅंकेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

First published: January 24, 2020, 10:22 PM IST

ताज्या बातम्या