लुटण्यासाठी चोरट्यांनी थेट रिक्षाच अंगावर घातली, भयानक घटनेचा VIDEO आला समोर

लुटण्यासाठी चोरट्यांनी थेट रिक्षाच अंगावर घातली, भयानक घटनेचा VIDEO आला समोर

रस्ता देण्यासाठी गिरीश बाजूला सरकले मात्र रिक्षा चालकाने त्यांच्याच अंगावर रिक्षा घातली आणि त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

औरंगाबाद, 28 फेब्रुवारी : औरंगाबादेत अंगावर रिक्षा घालून लुटण्याचा अजब प्रकार घडला आहे. शहरातील विद्या नगर येथील ही घटना आहे. गिरीश गोळेगावकर असं लूट करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून रिक्षाच्या धडकेमुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

गिरीश गोळेगावकर हे मध्यरात्री परभणीवरून औरंगाबाद आले. पायी घराकडे जात असताना एक रिक्षा त्यांच्या मागून वेगात आली. रस्ता देण्यासाठी गिरीश बाजूला सरकले मात्र रिक्षा चालकाने त्यांच्याच अंगावर रिक्षा घातली आणि त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी गिरीश गोळेगावकर बचावले आणि जीव वाचवण्यासाठी पळत सुटले.

रिक्षाच्या धडकेतून वाचल्यानंतर तिथून पळत सुटलेल्या गिरीश यांना पकडण्यासाठी रिक्षातील एक जण त्यांच्या मागे धावत सुटला. तसंच रिक्षानेही त्यांचा पाठलाग केला. पुढे गिरीश यांच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना खाली पडले आणि त्यांचा मोबाइल आणि पैसे घेऊन चोरटे पसार झाले.

दरम्यान, रिक्षाने पुन्हा धडक दिल्यानंतर गिरीश गोळे गावकर यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी चोरी करताना थेट नागरिकाच्या अंगावर रिक्षा घालण्याच्या प्रकरामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

First published: February 28, 2020, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading