Home /News /maharashtra /

बापाच्या डोक्यात वरवंटा घालणाऱ्या मुलास न्यायालयाने दिली ही शिक्षा

बापाच्या डोक्यात वरवंटा घालणाऱ्या मुलास न्यायालयाने दिली ही शिक्षा

बापाच्या डोक्यात वरवंटा घालणाऱ्या मुलास औरंगाबाद अतिरिक्त सत्र न्यायालयाने 5 वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला.

    औरंगाबाद, 5 ऑगस्ट : बापाच्या डोक्यात वरवंटा घालून त्याचा खून करणाऱ्या मुलास आज अतिरिक्त सत्र न्यायालयाने 5 वर्षाचा सश्रम कारावास आणि 2 हजार रूपये दंड ठोठावला. अमोल मधुकर खंडागळे असे या मुलाचे नाव आहे. ट्रकचालक मधुकर खंडागळे हे औरंगाबादेतल्या मुकुंदवाडीत राहायचे. 21 नोव्हेंबर 2012 रोजी रात्री दहा वाजता मधुकर खंडागळे यांनी दारूच्या नशेत मुलगा अमोल आणि पत्नी सोजराबाई हिला शिवीगाळ केली. यावेळेस रागाच्या भरात अमोलने बापाच्या डोक्यात वरवंटा घालून त्याचा खून केला. अखेरीस मधुकर खंडागळेंचा घाटी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनतर अमोलची आई सोजराबाई हिने दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीसांनी अमोलविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी साक्षीदार आणि अनेक बीबींची तपासणी केल्यानंतर सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशांनी अमोल खंडागळेला 5 वर्षाचा सश्रम कारावास आणि दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला.  VIDEO : 'बेटी बचाओ,बेटी भगाओ' मनसेचं आंदोलन
    First published:

    Tags: Additional sessions court, Amol khandagale, Aurangabad, Court, Has given punishment, His father, Madhukar khandagale, To the son, Who murdered, अतिरिक्त सत्र न्यायालय, अमोल खंडागळे, औरंगाबाद, डोक्यात, दिली शिक्षा, न्यायालयाने, बापाच्या, मधुकर खंडागळे, मुलास, वरवंटा

    पुढील बातम्या