आता या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली औरंगाबाद महापालिका!

आता या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली औरंगाबाद महापालिका!

औरंगाबाद महापालिकेचे भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता चरणसिंग चहल यांनी केलाय.

  • Share this:

सिध्दार्थ गोदाम, औरंगाबाद, 15 सप्टेंबर : औरंगाबाद महापालिका कचऱ्याच्या समस्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात गाजली होती. आता पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यालाच उपमहापौरांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपामुळे पुन्हा एकदा ही महापालिका चर्चेत आली आहे. या बाबतीत दीड कोटीचे टेंडर पास करत नसल्याने अभियंत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलीसात दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेचे भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता चरणसिंग चहल यांनी केलाय.

विजय औताडे यांनी दीड कोटीची निविदा मंजूर करण्यासाठी शिवीगाळ आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप चरणसिंग चहल यांनी केलाय. तर सेनेचे महापौर नंदू घोडीले यांनी उपमहापौर औताडे यांची पाठराखण केलीय. औताडे आणि चहल यांनी दोघांनीच पाणीपुरवठा विभागाच्या संचिका निकाली काढल्या होत्या. सर्वसाधारण सभेमध्येही याविषयावर कोणताच वाद झालेला नसताना, चहल यांनी चुकीचा आरोप केल्याचा दावा महापौर नंदू घोडीले यांनी केला आहे.

तर, अटजींच्या शोकसभेला विरोध केल्याने एमआयएमच्या नगरसेवकाला भाजपच्या नगरसेवकांनी चांगलेच धुतले होते. त्याचा राग मनात असलेल्य़ाने एमआयएमच्या आमदार इम्तियाज जलिल यांनी भाजपची राज्यात गुंडागर्दी वाढल्याचा आरोप केलाय.

औरंगाबाद महापालिकेमध्ये नगरसेवकांच्या कामांच्या संचिका लवकर निकाली काढल्या जात नाहीत. याचा राग नगरसेवकांच्या मनात आहेच, त्यातच चहल यांच्या आरोपांमुळे भविष्यकाळात नगरसेवकांविरूध्द अधिकारी असा संघर्ष उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीसांनी चहल यांची तक्रार स्वीकारली असली तरी याबाबत अद्याप कोणताच गुन्हा नोंदविण्यात आला नाही. मात्र, त्या दिवशी महापौरांच्या दालनात काय घडले याचा शोध आता पोलीस घेणार आहेत. राजकिय दृष्ट्या एकमेकांच्या विरोधात असलेले सेना-भाजप, चहल यांच्या तक्रारी नंतर एकमेकांच्या पाठीशी उभे ठाकलेले दिसत आहेत.

 भूतानच्या माजी पंतप्रधानांनी जेव्हा पत्नीला घेतलं पाठीवर!

First published: September 15, 2018, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading