औरंगाबादेत धोका वाढला, कोरोनाचा 12 वा बळी, आणखी आढळले 17 नवे रुग्ण

राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. मुंबई, पुणेपाठोपाठ औरंगाबादेतही कोरोनाबाधित रुग्ण झपाट्यानं वाढत आहे.

राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. मुंबई, पुणेपाठोपाठ औरंगाबादेतही कोरोनाबाधित रुग्ण झपाट्यानं वाढत आहे.

  • Share this:
    औरंगाबाद, 7 मे: राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. मुंबई, पुणेपाठोपाठ औरंगाबादेतही कोरोनाबाधित रुग्ण झपाट्यानं वाढत आहे. औरंगाबाद शहरात गुरुवारी कोरोनाने आणखी एकाचा बळी घेतला आहे. तसेच 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ऐकूण कोरोनाबाधितांची संख्या 373 झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळा एका 75 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. काल (6 मे) दिवसभरात एकूण 36 कोरोना पाझिटिव्ह रुग्ण आढळून होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. हेही वाचा.. पालघर साधू हत्यांकाडप्रकरण: तब्बल 20 दिवसानंतर समोर आली महत्त्वपूर्ण माहिती दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. तर दुसरीकडे मराठवाड्याची राजधानी असलेली औरंगाबाद नगरी आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या जिल्ह्यात मुंबई, पुणे, मालेगावनंतर आता औरंगाबाद शहराचा नंबर लागला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. शहरात 13 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. मात्र, मार्च महिन्यात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. शिवाय पहिली महिला रुग्ण ही उपचाराअंती ठणठणीत बरी होऊन घरी परतली. त्यामुळे औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. हेही वाचा...बीडमध्ये रेशनची साठेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, भाजप नेत्याविरुद्ध गुन्हा शहरात हॉटस्पॉटही वाढत गेले. शहरातील किलेअर्क, नूर कॉलनी, आसिफिया कॉलनी,भीमनगर, सातारा परिसर, देवळाई, समतानगर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. परंतु, 21 मार्च ते 1 मेपर्यंत शहरातील इतर परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. यामध्ये नुर कॉलनी, मुकुंदवाडी, संजयनगर, भीमनगर भावसिंगपुरा या भागात मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
    First published: