धक्कादायक! कोरोनाची धास्ती वाढली, आता तर नातेवाईकही स्विकारत नाही मृतदेह

धक्कादायक! कोरोनाची धास्ती वाढली, आता तर नातेवाईकही स्विकारत नाही मृतदेह

कोरोनाच्या धास्तीनं मृतदेह नातेवाईक स्विकारायला तयार होत नाही आहेत. त्यामुळे कोरोनाची दहशत किती आहे, याची कल्पना येते.

  • Share this:

औरंगाबाद, 29 मे: औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात कोरोनानं हाहाकार उडवून दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1453 वर पोहोचला आहे तर आतापर्यंत 68 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या धास्तीनं मृतदेह नातेवाईक स्विकारायला तयार होत नाही आहेत. त्यामुळे कोरोनाची दहशत किती आहे, याची कल्पना येते.

हेही वाचा...डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; उद्धव ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह स्विकारण्यास चक्क नकार दिला. यावेळी पंचशीला महिला बचत गटाच्या महिलांनी संबंधित रुग्णाचा मृतदेहा ताब्यात घेतला. रुग्णाच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार केले.

औरंगाबाद शहरात नागरिकांमध्ये कोरोनाची एवढ भीती आहे की, आपल्या नातेवाईकांचा मृतदेह सुद्धा नागरिक ताब्यात घेत नाही आहेत. अशा वेळी महापालिकेने ही जबाबदारी महिलांच्या बचत गटावर सोपवली आहे. जिगरबाज महिला संपूर्ण काळजी घेऊन कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करतात.

अंत्यसंस्कार करतेवेळी या महिला पूर्णपणे सुरक्षितता पाळतात. पंचशीला महिला बचत गटाच्या महिला या कार्याला माणुसकीचे कार्य समजतात. पूर्ण सुरक्षितेची काळजी घेतली तर घाबरण्याचे कारण नाही, असा संदेश पंचशीला बचत गटाच्या महिलांनी दिला आहे.

12 रुग्ण कोरोणामुक्त

एकीकडे शहरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शहरातील मिनी घाटी रुग्णालयातून 12 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 913 इतकी झाली आहे.

हेही वाचा..भाजप नेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, दुर्गंधी पसरल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

शुक्रवारी सकाळी शहरात 46 कोरोना पॉझटिव्ह रुग्ण आढळून आले. या 46 रुग्णांमुळं जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 453 वर गेली आहे. तर आतापर्यंत 68 जणांचा बळी या आजाराने घेतला आहे.

First published: May 29, 2020, 7:45 PM IST

ताज्या बातम्या