औरंगाबादकरांसाठी मोठी बातमी, पालिका आयुक्तांनी दिले महत्त्वाचे संकेत

औरंगाबादकरांसाठी मोठी बातमी, पालिका आयुक्तांनी दिले महत्त्वाचे संकेत

शहरात वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा रोखण्यासाठी आवश्यक आहे. जर शहर वाचवायचं असेल तर नागरिकांनी संचारबंदीचे कडक पालन केले पाहिजे.

  • Share this:

औरंगाबाद, 05 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरात सोमवारी कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद महानगर पालिकेचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शहरात कडक संचारबंदी लागू करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.

खासगी हॉस्पिटलकडून दरोडा, 500 च्या PPE कीटची किंमत ऐकून पालिकाही हादरली

'सोमवारी लोकप्रतिनिधीसोबत बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शहरात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाउन लागू करावा लागणार आहे. माझी स्वत:ची लॉकडाउन करण्याची तयारी आहे. परंतु, या बैठकीनंतरच निर्णय जाहीर केला जाईल', असंही केंद्रेकर यांनी स्पष्ट केलं.

'शहरात वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा रोखण्यासाठी आवश्यक आहे. जर शहर वाचवायचं असेल तर नागरिकांनी संचारबंदीचे कडक पालन केले पाहिजे.  नागरिकांनी ही संचारबंदी प्रशासनाची नाही तर स्वतःने स्वतःला लावलेली संचारबंदी समजावी' असं आवाहनही केंद्रेकर यांनी केले.

आज सकाळी आढळले 40 रुग्ण

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात 40 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 25 पुरूष, 15 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6681 कोरोनाबाधित आढळले असून 3241 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 300 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 3140 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

धक्कादायक! क्वारंटाइन सेंटरमध्ये दारू न मिळाल्यानं तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण

रेल्वे स्टेशन परिसर (3), अरिहंत नगर (1), पद्मपुरा (1), अविष्कार कॉलनी, एन सहा (1), वसंत विहार, देवळाई रोड, बीड बायपास (1), हनुमान नगर (1), अल्पाइन हॉस्पीटल परिसर (1), गारखेडा (2), मथुरा नगर (1), विष्णू नगर (1), चिकलठाणा (1), नुपूर सिनेमा परिसर, सिडको (2), मयूर पार्क (5), एन दोन सिडको (4), हर्सूल, पिसादेवी (1), दशमेश नगर (1), वेदांत नगर (1), जय भवानी नगर (2), प्राइड रेसिडन्सी (1), टीव्ही सेंटर (1), शास्त्री नगर (2), अशोक नगर, सिंधी बन (1)

ग्रामीण भागातील रुग्ण

आयोध्या नगर, बजाज नगर (1), क्रांती नगर, बजाज नगर (2), अंधानेर, कन्नड (1), रांजणगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: July 5, 2020, 1:20 PM IST

ताज्या बातम्या