औरंगाबादमधून आली धक्कादायक बातमी, कोरोनाचा नववा बळी, तर रुग्ण संख्या 273 वर

औरंगाबादमधून आली धक्कादायक बातमी, कोरोनाचा नववा बळी, तर रुग्ण संख्या 273 वर

औरंगाबादमध्ये आज सकाळी आणखी 17 कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 273 वर पोहोचली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 03 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 52 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबादमध्ये आज सकाळी आणखी 17 कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 273 वर पोहोचली आहे.

शनिवारी शहरात आणखी एका महिलेचा कोरोनामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्याही 9 वर पोहोचली आहे.

हेही वाचा - पुण्यात उद्यापासून असे होतील बदल, कुठे सूट तर कुठे बंदी कायम

घाटी रुग्णालयात एका 65 वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलं होतं. परंतु,  कोविड, न्यूमोनिआ, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विकाराने या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात या महिलेच्या लाळेचा नमुना घेतला असता  कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

शनिवारपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) कोविड रुग्णालयात सध्या 22 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 20 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. दोन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. शुक्रवारपर्यंत घाटी रुग्णालयात केवळ अकरा कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र, एका खासगी रूग्णालयातून सहा, दुसऱ्या रुग्णालयातून तीन आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथून  एका रुग्णांना घाटीमध्ये  दाखल करण्यात आले आहे.  शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत 185 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती.  त्यापैकी 18 जणांचे स्वॅब  घेण्यात आलेले आहेत. त्यातील 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले असून सात रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे.

हेही वाचा - लॉकडाउनमध्येही अमिताभ बच्चन यांच्यासोबत KBC खेळण्याची संधी, असं करा रजिस्ट्रेशन

त्यामुळे शनिवारी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही 244 वर पोहोचली होती. जिल्ह्यातील 244 रुग्णांवरील उपचारापैकी आतापर्यंत 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे.  तर एकूण 211 उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 121 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात एकूण 8 रूग्ण व उर्वरीत रुग्णांवर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराची प्रक्रिया सुरू आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 3, 2020, 9:41 AM IST

ताज्या बातम्या