औरंगाबाद बहिण-भावाच्या हत्याकांडाला नवे वळण, धक्कादायक माहिती समोर

औरंगाबाद बहिण-भावाच्या हत्याकांडाला नवे वळण, धक्कादायक माहिती समोर

'घरात दरवाजा, खिडकी आशा कुठल्याही वस्तू तोडलेल्या नव्हत्या. त्यामुळे मारेकरी हे मयताचे ओळखीचे असल्याची शक्यता आहे'

  • Share this:

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद,  10 जून : औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात बहिण आणि भावाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार पथक तैनात केली आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून किरण खंदाडे आणि सौरभ खंदाडे  या दोन्ही  बहीण भावाची हत्या करण्यात आली व त्यानंतर घरातील सुमारे एक किलोपेक्षा अधिक सोने लंपास करण्यात आले असल्याची बाब आता समोर आली आहे. हे प्रकरण ब्लाइंड मर्डर असून चार पथके तैनात करण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात यश येईल, असा विश्वास पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-आमचा मुख्यमंत्री अजून झाला नाही पण..,राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचे सूचक विधान

शहरातील सातारा परिसर भागात राहणाऱ्या राजपूत कुटुंबातील 18 वर्षीय किरण आणि 16 वर्षीय  सौरभ या दोन्ही भाऊ बहिणीची 9 जून रोजी रात्री गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या नंतर घरातील सुमारे एक किलो पेक्षा अधिक सोने लंपास झाले आहे. पोलिसांनी या ब्लाइंड मर्डर चा तपास सुरू केला आहे.

मारेकरी हे ओळखीचे असावे?

आज सकाळी फॉरेन्सिक टीमच्या पथकाने घरातील सर्व साहित्याची पाहणी केली. त्याच बरोबर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. घरात दरवाजा, खिडकी आशा कुठल्याही वस्तू तोडलेल्या नव्हत्या. त्यामुळे मारेकरी हे मयताचे ओळखीचे असल्याची शक्यता आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करीत आहेत.

घराच्या कंपाउंडमध्ये सापडला एका रुमाल

घरातील कंपाउंडच्या आतमध्ये एक रुमाल श्वान पथकाला सापडला.  या रुमालामध्ये 100 रुपयांची एक नोट आणि बांगडी देखील सापडली आहे. नेमकी कोणत्या कारणाने हे दुहेरीकांड घडले या निष्कर्षांपर्यंत अजून पोलीस पोहोचलेले नाही. शवविच्छेदन अहवाल व मृताच्या मोबाईल रेकॉर्ड नंतर काही धागेदोरे हातात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा-घरात वाहिला रक्ताचा पाट, चुलत भावानेच केली भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

'ही पूर्णपणे ब्लाइंड मर्डर केस आहे. पोलिसांकडून विविध दिशेनं तपास सुरू असून गुन्ह्यात वापरलेले हत्यार मिळालेले नाही, हत्येनंतर मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत. सर्व अंगाचा विचार करून तपास सुरू असून लवकरच आरोपी अटक करण्यात यश येईल', अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

संपादन - सचिन साळवे

First published: June 10, 2020, 1:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading