शिवसेना देणार भाजपला दणका, औरंगाबाद निवडणुकीआधी खिंडार पाडण्याची शक्यता

शिवसेना देणार भाजपला दणका, औरंगाबाद निवडणुकीआधी खिंडार पाडण्याची शक्यता

भाजपमधील कार्यकर्ते शिवसेनेत जाऊन आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करू इच्छित आहेत असे दिसत आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 12 फेब्रुवारी : भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह आठ नगरसेवक शिवसेनेत येण्याच्या तयारीत आहेत, अशी शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. किशनचंद तनवाणी हे सतत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्यासोबत गजानन बारवाल, जगदीश सिध्द, जयश्री कुलकर्णी आणि अन्य पाच जण शिवसेनेत प्रवेश करंणार असल्याची माहिती आहे.

मुंबई आणि औरंगाबादच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्हा स्तरावर काम करणारे कार्यकर्ते पुन्हा आपल्या मूळ पक्षामंध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. औरंगाबाद शहरातील काही कार्यकर्त्यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. तर काही कार्यकर्ते महापालिका निवडणुकांच्या आधी पुन्हा शिवसेनेकडे वळत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या दोन्हीही शहराच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मनसेसोबत युती करण्याचे संकेत दिले जात आहेत. ही नांदी लक्षात घेऊनच भाजपमधील कार्यकर्ते शिवसेनेत जाऊन आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करू इच्छित आहेत असे दिसत आहे.

मूळ शिवसैनिक असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष किशू तनवाणी शिवसेना आणि आपल्या मित्रांना सोडून भाजपमध्ये गेले होते. परंतु त्यांच्या पदरात संघटनात्मक जबाबदारीशिवाय काहीही पडले नाही. त्यामुळे त्यांच्यासह कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

किशनचंद तनवाणी यांनी भाजप श्रेष्ठींना महापालिका निवडणूक होईपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली. मात्र भाजपने तनवाणी यांची मागणी मान्य केली नाही. उलट तनवाणी यांचे विरोधक संजय केनेकर यांची निवड शहराध्यक्षपदी केली.

त्यामुळे तनवाणी आणि त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तनवाणी यांना येत्या 14 फेब्रुवारी रोजी मातोश्रीवर बोलावल्याची माहिती आहे. त्यामुळे 14 तारखेला तनवाणी आपल्या समर्थकांना सोबत घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

First published: February 12, 2020, 10:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading