एका क्षणाचा विलंब जीववर बेतला असता, 3 सेकंदात काय घडलं पाहा CCTV VIDEO

एका क्षणाचा विलंब जीववर बेतला असता, 3 सेकंदात काय घडलं पाहा CCTV VIDEO

भरधाव दुचाकीवरून तीन तरुण ओलांडत होते रूळ, समोरून आली एक्स्प्रेस आणि...

  • Share this:

औरंगाबाद, 17 फेब्रुवारी: अनेकवेळा रेल्वे रुळ ओलांडू नये अशा वारंवार सूचना देऊनही रेल्वे रुळ ओलांडण्याचं धाडस केलं जातं. असाच एक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात घडला आहे. भरधाव गाडी घेऊन जात असताना भीषण अपघात होताना टळला मात्र एका क्षणासाठी जरी विलंब झाला असता तर होत्याचं नव्हतं झालं असतं. बऱ्याचदा रेल्वे रुळ उशीर होतो म्हणून ओलांडण्याचं धाडस केलं जातं. अशावेळी आपली एक चूक जीवावर बेतू शकते याचा विचार मात्र मनात येत नाही आणि मग असे प्रकार घडतात.

औरंगाबादच्या संग्रामनगर भागात रेल्वे रूळ ओलांडताना दुचाकी चालकाचा तोल गेला आणि दुचाकीवरचे तिघेही खाली पडले. तेवढ्यात मागून भरधाव एक्स्प्रेस आली. तिघेही गाडीखाली जाणार तेवढ्यात त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी खेचून रेल्वे रुळावरून बाहेर काढलं. एक सेकंदाचाही उशीर हा तिघांच्या जीवावर बेतला असता. अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हेही वाचा-VIDEO : ट्रकमधून फिरताना हत्तीला दिसला ऊस अन् रस्त्यातच घेतला लंच ब्रेक

दैव बलवत्तर म्हणून तिघांचे प्राण वाचले. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. तोल जाऊन पडलेल्या तीन तरुणांचे प्राण वाचवताच 2 सेकंदात भरधाव एक्स्प्रेस आली. पडल्यावर उठताना जर उशीर लावला असता तर ही तीनही तरुणांचा जागीच मृत्यू झाला असता. मात्र दैव बलवत्तार म्हणून वाचले. यामध्ये मात्र दुचाकीचा चुराडा झाला आहे. हा सगळा थरार रेल्वे रुळांवर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

हेही वाचा-VIDEO : भयंकर वादाळामुळे रन वेवर उतरलेलं विमान पुन्हा हवेत उडालं

First published: February 17, 2020, 1:51 PM IST

ताज्या बातम्या