औरंगाबाद, 23 सप्टेंबर : औरंगाबादमध्ये बिअर बारचं गेट तोडून बारमधील रोख रकमेसह विदेशी दारुच्या बाटल्यांची चोरी झाली. ही चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिउर येथे शिवनेरी रेस्टॉरेंट आणि बार मध्ये ही चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी सुमारे 50 हजारांची रक्कम लंपास केली.