औरंगाबाद, 20 नोव्हेंबर : सणसुदीनंतरही लुटपाट आणि दरोड्याच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या नागरिकांनामध्ये आता चोरी आणि दरोडेखोरी यामुळे भीती निर्माण झाली आहे. औरंगाबादमध्ये चोरांनी धुमशान घातलं आहे. ATM लुटण्यासाठी आलेल्यांना ते फोडता आलं नाही म्हणून मशीन पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासणी सुरू केली आहे. औरंगाबाद-पैठण रोडवरील धोरकीन बाजारपेठेत ही धक्कादायक घटना समोर आळी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंडिया बँकेचं हे ATM होतं. गुरुवारी दुपारी या ATMमध्ये पैसे भरण्यात आले होते. ATM फोडता आलं नाही म्हणून अख्ख मशीन पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांव्यतिरिक्त फॉरेन्सिक, डॉग स्कॉड, सह विविध पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर चोरट्यानी एटीएम उखडून चारचाकी गाडीतून पोबारा केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.