Home /News /maharashtra /

BREAKING: देवदर्शन करून येत असतानाच काळाचा घाला, भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू

BREAKING: देवदर्शन करून येत असतानाच काळाचा घाला, भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू

अपघातातील 9 जणांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    सचिन जिरे (प्रतिनिधी)औरंगाबाद, 31 जानेवारी: औरंगाबाद-जालना रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. करमाड जवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास क्रूझर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबादहून सिंदखेडराजा इथे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर ही कार धडकली आणि मोठी दुर्घटना घडली. दरम्यान या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 9 जण जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास इगतपुरी येथून देवदर्शन करून बुलढाण्याला जात असताना काळानं घाला घातला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलवर क्रूझर धडकली आणि होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान काशिनाथ देवराव मेहत्रे, रवी बबन जाधव, संगीता गणेश बुंदे,  ऋषीधर देवराव तिडके अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. तर 9 जणांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हे सगळे जण देवाचं दर्शन घेऊन बुलडाण्याच्या दिशेनं जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अद्याप कारण समोर येऊ शकलं नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Aaurangabad, Car accidend

    पुढील बातम्या