MBBS च्या विद्यार्थ्याने आत्महत्या करत संपवलं जीवन, पोलिसांकडून मोबाईल संभाषणाची तपासणी

MBBS च्या विद्यार्थ्याने आत्महत्या करत संपवलं जीवन, पोलिसांकडून मोबाईल संभाषणाची तपासणी

यश नरसिंगराव गंगापूरकर असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 2 जानेवारी : औरंगाबादमध्ये एम.बी.बी.एसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यश नरसिंगराव गंगापूरकर असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश गंगापुरकर हा गेल्या दोन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो बेगमपुरा येथील ब्राम्हण गल्ली येथे त्याच्या आईसोबत खोली घेऊन राहात होता. 25 डिसेंबर रोजी घाटी रुग्णालयात एका रुग्णावर उपचार करून तो घरी गेला.

दरम्यान दुसऱ्या दिवशी त्याने राहत्या घरी दुपारी 11 च्या सुमारास विष प्राशन केले. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यशचा विष प्राशन करून मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्रासह मोबाईलमध्ये झालेल्या संभाषणाची कसून तपासणी केली. तसंच त्याच्या महाविद्यालयतील शिक्षकांकडून तो तणावात होता का याची माहिती घेतली. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचं तपास अधिकारी राजकुमार जाधव यांनी सांगितलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 2, 2021, 3:58 PM IST

ताज्या बातम्या