औरंगाबाद, 10 फेब्रुवारी : अचानक कोणाच्या बँक खात्यात लाखो रुपये आले तर कोणालाही आनंदच होईल. असंच काहीसं चित्र गेल्या वर्षी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District’s Pathan Taluka) राहणाऱ्या ज्ञानेश्वर ओटे (Gyaneshwar Ote) याच्या घरात दिसलं. जेव्हा त्याच्या जन धन बँक खात्यात (Jan Dhan Bank Account) 15 लाख रुपये जमा झाले होते. ज्ञानेश्वरला वाटलं की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minsiter Narendra Modi ) आपलं निवडणुकीचं वचन पूर्ण करीत आहे. यासाठी सरकारने त्याच्या खात्यात पैसे पाठवले. याशिवाय विशेष म्हणजे त्याने पंतप्रधान मोदींना धन्यवाद देणारं पत्रही लिहिलं.
9 लाखात तयार केलं नवं घर..
यानंतर ज्ञानेश्वरने घरात तयार करण्यासाठी आपल्या बँक ऑफ बडोदाच्या (Bank Of Baroda) खात्यातून 9 लाख रुपये काढले. मात्र 6 महिन्यातच शेतकऱ्याचं स्वप्न तुटलं. बँकेने त्याला नोटीस पाठवल्यानंतर शेतकऱ्याला धक्काच बसला. ही रक्कम चुकून शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली होतीय. याशिवाय बँकेने त्याला संपूर्ण रक्कम परत देण्यास सांगितलं. ज्ञानेश्वरने सांगितलं की, त्यांना वाटलं की पीएम मोदींनी हे पैसे पाठवले आहेत. यानंतर शेतकऱ्याने 15 लाख पैकी 6 लाख रुपये परत केले. मात्र 9 लाख रुपये देऊ शकले नाही. ज्यात त्यांनी आपलं घर तयार केलं.
हे ही वाचा-औरंगाबाद: पाण्यासाठी दोन जावांमधील वाद गेला विकोपाला; एकीचा विहिरीत आढळला मृतदेहचुकून ट्रान्सफर झाले पैसे...
मिळालेल्या माहितीनुसार, हे पैसे विकासासाठी पिंपलावडी ग्राम पंचायतीच्या खात्यात ट्रान्सफर करावयाचे होते. मात्र चुकून हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात गेले. चार महिन्यानंतर ग्राम पंचायतीनंतर हे पैसे ज्ञानेश्वरच्या खात्यात गेल्याचं त्यांना कळालं. ज्यानंतर बँकेने त्यांना नोटीस पाठवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.