धक्कादायक! मोठी बहिण रागावल्याने 8 वीच्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मोठी बहिण रागावल्याने 8 वीच्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मोठ्या बहिणीचं रागावणं सहन न झाल्याने शिल्पाने घराजवळील उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

  • Share this:

औरंगाबाद, 20 सप्टेंबर : मोठी बहिण रागावली म्हणून 14 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शिल्पा रामकुमार धनगावकर असं आत्महत्या करणाऱ्या युवतीचे असून ती आठवी इयत्तेत शिकत होती.

अभ्यास करत नसल्याने शिल्पा हिची मोठी बहिण तिच्यावर रागावली. मोठ्या बहिणीचं रागावणं सहन न झाल्याने शिल्पाने घराजवळील उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. औरंगाबाद शहरातील हडको एन-11 परिसरात ही घटना घडली आहे.

बहिण रागवल्यानंतर शिल्पा धनगावकर ही बुधवारी रात्री रागारागाने घराबाहेर पडली. तेव्हा पासून ती बेपत्ता होती. त्यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी तिचा शोधाशोध सुरू केला. मात्र त्यांना शिल्पाला शोधण्यात अपयश आलं. हडको परिसरातील बाळासाहेब ठाकरे उद्यानात आज सकाळी काही नागरिक मॉर्निंग वॉकला गेले असता शिल्पाचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला.

उद्यानातील विहिरीत मुलीचा मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर तेथील नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्जचार तिथं दाखल झाले आणि त्यांनी विहिरीतून शिल्पाचा मृतदेह बाहेर काढला.

फक्त बहिण रागावली या कारणामुळे शिल्पाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. शिल्पाच्या आत्महत्येबद्दल कळताच तिच्या कुटुंबीयांना टाहो फोडला. दरम्यान, याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 12:19 PM IST

ताज्या बातम्या