• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • औरंगाबादेत वंदे मातरम् तर नाशिक महापालिकेत पाणी पट्टीवाढीवरून गरादोळ

औरंगाबादेत वंदे मातरम् तर नाशिक महापालिकेत पाणी पट्टीवाढीवरून गरादोळ

औरंगाबाद महापालिकेत आज सकाळी वंदे मातरम् वादावरून हा गोंधळ झाला. सभागृहात वंदे मातरम् सुरू असतानाच एमआयएम आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक खाली बसल्याने हा गोंधळ उडाला.

  • Share this:
नाशिक/औरंगाबाद, 19 ऑगस्ट : औरंगाबादपाठोपाठ नाशिक महापालिकेतही नगरसेवकांनी गोंधळ घातला. औरंगाबाद महापालिकेत आज सकाळी वंदे मातरम् वादावरून हा गोंधळ झाला. सभागृहात वंदे मातरम् सुरू असतानाच एमआयएम आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक खाली बसल्याने हा गोंधळ उडाला. औरंगाबाद महापालिकेतला हा गोंधळ मिटतो न मिटतो तोच तिकडे नाशिकच्या महापालिका सभेतही पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या दरवाढीवरून विरोधकांनी महापौरांसमोरचा राजदंडच पळवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी यावेळी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. या अभूतपूर्व गोंधळातच महापौरांनी सभेचं कामकाज तहकूब केलं.
First published: