Home /News /maharashtra /

BREAKING : चंद्रपुरात कबड्डी स्पर्धेत प्रेक्षक गॅलरी कोसळली, 20 जण जखमी, LIVE VIDEO

BREAKING : चंद्रपुरात कबड्डी स्पर्धेत प्रेक्षक गॅलरी कोसळली, 20 जण जखमी, LIVE VIDEO

 जखमींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील 7 जण गंभीर आहेत.

जखमींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील 7 जण गंभीर आहेत.

जखमींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील 7 जण गंभीर आहेत.

    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 04 डिसेंबर : चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील वरोरा शहरात कबड्डी स्पर्धेदरम्यान (Kabaddi competition) प्रेक्षक गॅलरी कोसळण्याची (Audience gallery collapses) घटना घडली आहे. या घटनेत 20 प्रेक्षक जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे.या दुर्घटनेत 7 जण गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  वरोरा  शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज स्पर्धेला सुरुवात झाली. कबड्डीचा सामना पाहण्यासाठी स्थानिक तरुणांनी मोठी गर्दी केली होती. उद्घाटन सत्रात तुडुंब भरलेल्या लाकडी प्रेक्षक गॅलरीला भार असह्य झाला आणि गॅलरी पत्त्यासारखी कोसळली. या वेळेस शेकडो प्रेक्षक यावेळी उपस्थित होते. अचानक गॅलरी कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. पण सुदैवाने गॅलरीची उंची कमी असल्यामुळे कुणाला मोठी दुखापत झाली नाही. लगेच सामना थांबवण्यात आला आणि सर्व खेळाडूंनी मदतीतीसाठी धाव घेतली. सर्व जखमींना लगेच बाहेर काढण्यात आले. या घटनेत सुमारे 20 प्रेक्षक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील 7 जण गंभीर आहेत. कटप्पाने बाहुबली को क्यू मारा? नागपुरात काँग्रेसच्या गोटात रंगली चर्चा सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक काँग्रेस आमदार प्रतिभा बाळू धानोरकर यांच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जात होते. काही गंभीर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या