Home /News /maharashtra /

चक्क उपसरपंचपदासाठी जाहीर लिलाव,10 लाख 50 हजारांची बोली, VIDEO व्हायरल

चक्क उपसरपंचपदासाठी जाहीर लिलाव,10 लाख 50 हजारांची बोली, VIDEO व्हायरल

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील महाटी येथील हा प्रकार असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नांदेड, 24 नोव्हेंबर :  लॉकडाउनमुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका (gram panchayat election) नुकत्याच जाहीर झाल्या आहे. त्यांनतर प्रत्येक गावात राजकारण तापले आहे. नांदेड जिल्ह्यामधील (Nanded) एका गावात तर उपसरपंचपदासाठी बोली लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपसरपंचपदाच्या या लिलावासाठी तब्बल 10 लाख 50 हजारांचा लिलाव लावण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील  मुदखेड तालुक्यातील महाटी येथील हा प्रकार असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे, या लिलावात अख्खं गाव सहभागी झाले आहे. उपरसपंचपदासाठी गावाकऱ्यांनी बैठक बोलावली होती. आधीच सरपंचपदाचा लिलाव पार पडला होता. त्यानंतर उपसरपंचपदासाठी लिलाव घेण्यात आला. या व्हिडीओमध्ये 8 लाखांसाठी बळीकंत राम ढगे यांच्या नावाने बोली लागली होती. त्यानंतर एक व्यक्ती बोलीची रक्कम वाढवण्यासाठी विचारत आहे. त्यानंतर व्यंकटराव मोहिते पाटील यांनी 9 लाखांची बोली लावली. त्यानंतर ही बोली वाढतच गेली. अखेर माधवराव गणपतराव ढगे यांनी 10 लाख 50 हजारांची बोली लावली आणि उपसरपंचपद बहाल करण्यात आले आहे.  उपसरपंचपद हे 10 लाख 50 हजाराला विकलं गेलं. या गावात सरपंचपदाचा देखील जाहीर लिलाव झाल्याचं सांगण्यात येत  आहे. महाटी गावचे सरपंचपद ओबीसीसाठी सुटले. उपसरपंचपद सर्वसामान्य गटासाठी राहणार आहे. तेव्हा या पदासाठी गावात चढाओढ निर्माण झाली आणि निवडणुकीपूर्वीच उपसरपंचपद जाहीर लिलाव झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोग काय कारवाई करते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nanded, नांदेड

पुढील बातम्या