ठाणे,04 नोव्हेंबर: मोपलवार खंडणी प्रकरणात आता पोलिसांनी सतीश मांगलेंचा मेहुणा अतुल तावडेला पकडण्यात यश मिळालं आहे. आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना ब्लॅकमेल करून 7 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी सतीश मांगले आणि श्रद्धा मांगले यांना अटक करण्यात आली होती.
ठाणे खंडणी विरोधी पथकाने सतीश मांगलेच्या मेहुण्याला आज रात्रीच्या सुमारास अटक केली आहे.या साऱ्या प्रकरणात अतुल तावडे अतुलचा खंडणी प्रकरणात सुरवातीपासून सहभाग होता.
राधेश्याम मोपलवार यांच्यावर सतीश मांगले यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सतीश मांगले यानं त्याच्याकडे अनेक पुरावे असल्याचा दावा केला होता.त्या मोबदल्यात त्यानं मोपलवार यांच्याकडे सात कोटी रुपयांची मागणी केली होती. सतीश आणि त्याची पत्नी श्रद्धा यांच्या विरोधात मोपलवार यांनी तक्रार केल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली त्या दोघांकडून तब्बल सहा पोती कागदपत्रं आणि सीडीज जप्त करण्यात आल्या होत्या.
सतीशनं काही महिन्यांपूर्वी केलेल्या आरोपांमुळे मोपलवार यांना मुंबई त्यांच्या जबाबदारीपासून थोडं वेगळं करण्यात आलं होतं