अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नी प्रियंकासह चौघांना अटक

अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नी प्रियंकासह चौघांना अटक

ढोल-ताशा सिनेमाचे निर्माते अतुल तापकीर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीला अटक केलीये

  • Share this:

16 मे : ढोल-ताशा सिनेमाचे निर्माते अतुल तापकीर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह चौघांना अटक करण्यात आलीये.

शनिवारी रात्री पुण्यातील प्रेसिंडेट हॉटेलमध्ये विष पिऊन आत्महत्या केली होती. अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली. पत्नीच्या जाचाला कंटाळून

आत्महत्या करीत असल्याचं तापकीर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. याप्रकरणी तापकीर यांचे वडील आणि मित्रांच्या जबाबावरून सोमवारी रात्री पत्नी  प्रियांकासह अतुल तापकीर, कल्याण गव्हाणे, बाळू गव्हाणे आणि बाप्पू थिगळे  आणि मैत्रीणींवर 306 आणि 34 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर त्याच्या पत्नीसह चौघांना अटक करण्यात आलीये.

अतुल तापकीर यांनी २०१५ साली ढोल ताशा या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटामुळे त्यांचे नाव झाले. मात्र, त्यांना या चित्रपटामुळे आर्थिक तोटा झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी प्रियंका आणि अतुल यांच्यात वादाला सुरुवात झाली होती.

प्रियंका यांनी अतुल यांना घराबाहेर काढले. एवढंच नव्हे तर तापकीर यांना भावाच्या मदतीने मारहाणही केली. फोनवर शिवीगाळ केला, असे आरोप अतुल यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये केले होते. तसंच माझ्या मुलांचा साभाळ हा माझ्या वडिलांनी करावा, रोजचा मानसिक छळ मला सहन होत नसल्याममुळे मी आत्महत्या करत आहे, अशी पोस्ट फेसबुकवर टाकून अतुल तापकीर यांनी आत्महत्या केली होती.

First published: May 16, 2017, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading