भाजपचे अतुल भातखळकर यांनी News18 Lokmatशी बोलताना सांगितले की, " मुख्यमंत्री वाझेंना पाठीशी घालत आहेत का ? स्पीकरसमोर प्रस्ताव मंजूर होऊनही मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सभागृहात निवेदन बदलले जाते. हे तर साफ चुकीचे आहे." तसेच आज सभागृहात वाझेंचा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.