Home /News /maharashtra /

BREAKING : जळगावमध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार, थोडक्यात वाचला जीव!

BREAKING : जळगावमध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार, थोडक्यात वाचला जीव!

कुलभूषण पाटील पाटील आपल्या घराजवळ आले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

  इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 25 जुलै : जळगाव महापालिकेचे (Jalgaon Municipal Corporation ) उपमहापौर कुलभूषण पाटील (Deputy Mayor Kulbhushan Patil ) यांच्यावर गोळीबार (firing) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुलभूषण पाटील यांच्या घराजवळच हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यातून कुलभूषण पाटील बालबाल बचावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलभूषण पाटील यांच्यावर रात्री 9 वाजेच्या सुमारास हल्ला झाला आहे. पाटील आपल्या घराजवळ आले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. कुलभूषण पाटील आपला जीव वाचवण्यासाठी घरात पळाले. त्यामुळे ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. पाटील घरात गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक घराबाहेर आले असता हल्लेखोर पळून गेले. पत्नी सेक्सला नकार देण्यामागे ही देखील कारणं असू शकतात, चिडचिड नको तर.. या हल्ल्यानंतर कुलभूषण पाटील यांनी  प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज दुपारी शहरात क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी मी मध्यस्थी केली होती. पण, हा वाद काही मिटला नाही. शेवटी हा वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तिथे वाद मिटवण्यात आला. पण, या प्रकरणात एका गट संतप्त झाला होता. या गटाने मला पोलीस स्टेशनमध्येच शिवीगाळ केली होती. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती कुलभूषण पाटील यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. कुलभूषण पाटील यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहे. उपमहापौरावरच गोळीबार झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

  वादळाचा तडाखा, परतूरमधील विठ्ठलाची 51 फुटी मूर्ती कोसळली

  विशेष म्हणजे, 18 मार्च रोजी शिवसेनेनं (Shivsena) भाजपची (BJP) सत्ता उलथून लावण्यात जळगाव पालिकेवर भगवा फडकावला आहे. अवघ्या 15 नगरसेवकांच्या बळावर सेनेनं पहिल्यांदा जळगाव महानगरपालिकेवर आपला महापौर निवडून आणला. जयश्री महाजन यांची महापौर म्हणून निवड झाली.  तर  नगरसेवक कुलभूषण पाटील यांना उपमहापौरपद देण्यात आले होते. पाटील यांनी भाजपच्या बंडखोर गटाचे नेतृत्व केले होते. पाटील हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. त्यामुळे त्यांची उपमहापौर म्हणून निवड केली होती. नगरसेवक म्हणून पहिल्याच वेळी निवडून आलेले कुलभूषण हे 2019 च्या निवडणुकीच्या वेळी सेनेत नाराज होऊन 10 नगरसेवकांसह पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला होता आणि नगरसेवक म्हणून निवडून आले. पण भाजपात कोंडी झाल्यामुळे त्यांनी पुन्हा सेनेत प्रवेश केला.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Jalgaon

  पुढील बातम्या