मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पेटलेल्या अवस्थेत तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पळत सुटला, साताऱ्यातील घटना

पेटलेल्या अवस्थेत तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पळत सुटला, साताऱ्यातील घटना

तर परभणी महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात शाहिद खान या 30 वर्षीय तरुणानेआत्मदहनाचा प्रयत्न केला.

तर परभणी महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात शाहिद खान या 30 वर्षीय तरुणानेआत्मदहनाचा प्रयत्न केला.

तर परभणी महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात शाहिद खान या 30 वर्षीय तरुणानेआत्मदहनाचा प्रयत्न केला.

  • Published by:  sachin Salve

सातारा, 26 जानेवारी : देशभरात प्रजासत्ताक दिन (republic day ) मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. परंतु, साताऱ्यात (Satara) आणि परभणीमध्ये (Parbhani) दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोहर सावंत नावाच्या तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जातीवादी लोकांनी सोनगाव येथील घर उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप सावंत यांनी केला.

'मी अनुसूचित जातीचा असल्याने प्रशासन आणि पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याने हे कृत्य केल्याचे सावंत यांनी सांगितले. पेट घेतलेल्या अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पळत असताना पोलिसांनी त्यांना अडवले आणि आग विझवली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

'...तर अर्धी मिशी काढून खेळेन', अश्विनचं पुजाराला चॅलेंज!

तर परभणी महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात शाहिद खान या 30 वर्षीय तरुणानेआत्मदहनाचा प्रयत्न केला. महानगरपालिकेमध्ये झेंडावंदन तयारी सुरू असताना ही घटना घडली. अंगावर पेट्रोल टाकून पेटवून शाहिद खानने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच सुरक्षा रक्षक आणि मनपा कर्मचाऱ्यांनी रोखल्याने पुढील प्रकार टळला. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

First published:

Tags: Republic Day