• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; ठाण्यातील घटना कॅमेऱ्यात कैद

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; ठाण्यातील घटना कॅमेऱ्यात कैद

Thane Crime News: आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  • Share this:
ठाणे, 27 जून: आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच (Police team) चाकू हल्ला (attempt of knief attack) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा (Mumbra) परिसरात घडली आहे. अतिक्रमण तोडायला गेलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बद्रुद्दिन याने कारवाईपासून रोखले होते. या प्रकरणी महानगरपालिकेला अनधिकृत बांधकामांवर कारवाई करू दिली नाही म्हणून त्याच्याविरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोलीस बद्रुद्दिन याला पकडायला गेले असता बराच काळ त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. इतकेच नाही तर त्याचे नातेवाईक देखील पोलिसांशी हुज्जत घालत होते. याच दरम्यान बद्रुद्दिन याने बाजूच्या एका मटन शॉपमधून धारदार चाकू घेतला आणि तो पोलिसांवर धावून गेला. शिवाय मी स्वतःलाच संपवून टाकेल अशी भीती पोलिसांना देऊ लागला या सर्व घटनेचा व्हिडीओ एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये केला आहे. आधी भाड्याने घेतलं दुकानं नंतर पाडलं भगदाड, कोट्यवधीचं सोनं लुटणार तेच... या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आरोपी बद्रुद्दिन याला पोलीस पथक नेत असताना त्याचे नातेवाईक आले आणि पोलिसांना रोखलं. यानंतर बद्रुद्दिन याने पोलिसांपासून सुटका करुन शेजारी असलेल्या मटन शॉपमधून चाकू आणून पोलिसांवर धावून गेला. पोलिसांना चाकूचा धाक दाखवून बद्रुद्दिन घटनास्थळावरून फरार झाला. आरोपी बद्रुदिन याच्या विरोधात आता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने काही अनधिकृत बांधकाम केला आहे का याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकूणच मुंब्रा परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे.
Published by:Sunil Desale
First published: