पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला, कमरेवर आणि डोक्यात केले सपासप वार

पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला, कमरेवर आणि डोक्यात केले सपासप वार

जखमी झालेल्या दाम्पत्याला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

दापोली, 21 डिसेंबर : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील आंजर्ले भंडारवाडा इथं जागेच्या वादावरून एकाने आपल्या शेजारी राहणाऱ्या पती पत्नीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या दाम्पत्याला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंजर्ले भंडारवाडा येथील प्रभाकर तोडणकर आणि संदीप जाधव यांचं जागेवरून गेले अनेक वर्ष वाद असून दापोली तहसील आणि न्यायालयात दावे आहेत.

प्रभाकर तोडणकर यांनी त्यांच्या बागेत माड साफ करण्यासाठी गडी बोलावला होता. तो माड साफ करत असताना या वाडीत संदीप जाधव आले आणि त्यांनी या वाडीतील माडाचे झाप हातातील कोयतीने तोडण्यास सुरू केले तेव्हा तेथे पल्लवी तोडणकर आल्या आणि त्यांनी तुम्ही हे काय करता असं विचारलं असता त्याचा राग संदीप जाधव यांना आला आणि त्याने पल्लवी यांच्या हातावर, कमरेवर कोयतीने वार केले.

तेवढ्यात प्रभाकर तोडणकर हे पत्नीला सोडवण्यासाठी आले असता त्यांच्या ही डोक्यात संदीप याने कोयत्याने वार केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

दोन्ही जखमींना उपचारासाठी आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी त्याना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रभाकर तोडणकर यांनी संदीप जाधव याच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाढदिवशीच भाजप कार्यकर्त्यावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात घातला दगड

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दोन युवकांच्या निर्घृण हत्येमुळे खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी युवकांवर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची हत्या करण्यात आली. नंतर त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. दोन्ही युवक भाजपचे सक्रीय कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विशाल देशमुख (वय 30, रा.घाटपुरी नाका) आणि सचिन पवार (वय 33) अशी हत्या झालेल्या युवकांची नावं आहेत.

मिळालेली माहिती अशी की, विशाल देशमुख याचा शुक्रवारी वाढदिवस होता. विशाल आणि त्याचे काही मित्र शुक्रवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. घाटपुरी नाक्यावर विकास आणि सचिनवर तीन जणांनी धारधार शस्राने सपासप वार केले. नंतर त्यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. वाढदिवशी हा धक्कादायक प्रकार घडल्याने देशमुख कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दोन संशयित फरार आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अवैध व्यवसायातून विकास आणि सचिनची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. गजानन भोंगळ,रवींद्र भोंगळ,अरविंद भोंगळ अशी संशयितांची नाव असून सध्या पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी दोन संशयित आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Published by: sachin Salve
First published: December 21, 2019, 8:15 PM IST

ताज्या बातम्या