भुसावळात किरकोळ वादातून डॉक्टरवर चाकू हल्ला; पोलिस उपनिरीक्षकांना मारहाण

भुसावळात किरकोळ वादातून डॉक्टरवर चाकू हल्ला; पोलिस उपनिरीक्षकांना मारहाण

भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे किरकोळ वादातून एका डॉक्टरवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिंदी येथे एका जणाचे घराचे काम सुरू असल्यामुळे बांधकामाचे मटेरियल गटारामध्ये पडल्यामुळे हा वाद झाला

  • Share this:

भुसावळ, 13 मे- तालुक्यातील शिंदी येथे किरकोळ वादातून एका डॉक्टरवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिंदी येथे एका जणाचे घराचे काम सुरू असल्यामुळे बांधकामाचे मटेरियल गटारामध्ये पडल्यामुळे हा वाद झाला. गटार स्वच्छ करण्यावरून दोन जणांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्याने एकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

मिळालेली माहिती अशी की, शिंदी येथे गुरांचे डॉक्टर सचिन महाजन यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. असल्याने शेजारील गटारीमध्ये घराचे तसेच बांधकामाचे मटेरियल पडले. गटारीत घाण झाल्याने त्यांच्या शेजारी राहणारे संतोष निकम यांनी सचिन महाजन यांच्याशी वाद घातला. गटारीतून घाण काढून वर टाकल्याने सचिन महाजन व संतोष निकम यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. परंतु संतोष निकम यांनी सचिन महाजन यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात सचिन महाजन जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिस उपनिरीक्षकांना मारहाण, दोघे अटकेत

दरम्यान, एका दुसऱ्या घटनेत पोलिस उपनिरीक्षकांना मारहाण केल्याचा घटना घडली आहे. दीपनगर औष्णिक वीज केंद्रासमोर राख भरण्यासाठी उभ्या केल्या जाणाऱ्या बल्कर हटणाऱ्या पोलिस उनिरीक्षक गजानन करेवाड यांना मारहाण केली. दोन्ही संशयितांना पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे सहा बल्करदेखील पोलिसांनी जप्त केले.

तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांना रविवारी बल्कर रस्त्यावरून हटवण्याच्या सूचना दिल्या. 500 मेगावॅट प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर लावलेले बल्कर पोलिसांनी बाजूला करण्याची सूचना दिली. पोलीस कारवाई करत असतानाच संशयित अमन जगबीदर सुनसोये (रा.निंभोरा, ता. भुसावळ) आणि कुलदीप एकनाथ महाले (रा.समतानगर, भुसावळ) यांनी पोलिस उपनरिक्षक गजानन करेवाड यांना मारहाण केली. करेवाड यांच्या डाव्या गालास व डाव्या हाताच्या करंगळीला मार लागला. लगेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांनी धाव घेत दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

तब्बल 40 वर्षे पाण्याखाली होतं हे मंदिर, दुष्काळाची दाहकता दाखवणारा VIDEO

First published: May 13, 2019, 10:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading