मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

अंबरनाथ, 01 जून : शहरात प्रभाग क्रमांक ३७च्याशिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांचे पती अजित काळे यांच्यावर  प्राणघातक हल्ला करण्यात आला असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आनंदपार्क परिसरात दीड कोटी रुपयांचे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणात अनेक दुकाने तुटणार आहेत. यात विनोद माने याचे देखील अनधिकृत गाळे तुटणार आहेत. याचाच राग मनात ठेऊन विनोद माने आणि  प्रवीण माने याच्या सोबत काळे यांच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अजित काळे याच्यावर विनोद याने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. यात अजित याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी विनोद माने आणि प्रवीण माने याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published:

Tags: Shivsena, नगरसेविका, शिवसेना

पुढील बातम्या