Home /News /maharashtra /

Sangli Crime: जॉगिंगला गेलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकू हल्ला, सांगलीतील धक्कादायक प्रकार

Sangli Crime: जॉगिंगला गेलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकू हल्ला, सांगलीतील धक्कादायक प्रकार

जॉगिंगला गेलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकू हल्ला, सांगलीतील धक्कादायक प्रकार

जॉगिंगला गेलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकू हल्ला, सांगलीतील धक्कादायक प्रकार

Sangli News: सांगलीत उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

सांगली, 10 जून : सांगलीतून (Sangli) एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगलीतील उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पहाटेच्या सुमारास जॉगिंगला गेलेल्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम (Deputy Collector Harshlata Gedam) यांच्यावर अज्ञाताने चाकू हल्ला केला. (Attack on Deputy Collector Harshlata Gedam by anonymous person in Sangli) अज्ञाताने चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांना जखमी केले आहे. पहाटे जॉगिंगसाठी गेल्या असताना हा प्राणघातक हल्ला झाला आहे. या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षलता गेडाम अशा या महिला उपजिल्हाधिकारी यांचं नाव आहे. गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी छेडण्याचा प्रयत्न केला. उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर गलिच्छ भाषेचा वापर केला. त्यानंतर हात लावणाऱ्या अज्ञाताला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. वाचा : पोलिसांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेत्याचा मृत्यू, नागपूरमध्ये खळबळ यानंतर झालेल्या झटापटीत दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने चाकूने गेडाम यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्या हातावर किरकोळ जखम झाली आहे. त्यानंतर मार्शल आर्ट असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला. अज्ञात आरोपींपैकी एकाने 17 मे रोजी गेडाम यांचा पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. आज तिच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली आणि त्याने गेडाम यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Sangli

पुढील बातम्या