मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुद्याची लढाई आता जीवावर उठली, शिवसेना शाखेत घुसून विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला

मुद्याची लढाई आता जीवावर उठली, शिवसेना शाखेत घुसून विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला

 ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमधील शिवसेना शाखेत ही घटना घडली. शिवसेना शाखेत घुसून हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे.

ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमधील शिवसेना शाखेत ही घटना घडली. शिवसेना शाखेत घुसून हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे.

ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमधील शिवसेना शाखेत ही घटना घडली. शिवसेना शाखेत घुसून हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे.

ठाणे, 25 ऑगस्ट : भाजपचे  (bjp) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या अटकेमुळे आता भाजप (bjp) आणि शिवसेनेत (shivsena) संघर्ष पेटला आहे. मंगळवारी रस्त्यावर झालेला राडा आता एकमेकांच्या जीवावर उठला आहे. ठाण्यात शिवसेनेच्या शाखेत घुसून शिवसेना विभाग प्रमुखावर जीवघेणा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे,

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील शिवसेना शाखेचे शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल (  shivsena vibhag pramukh Amit Jaiswal ) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमधील शिवसेना शाखेत ही घटना घडली. शिवसेना शाखेत घुसून हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी चॉपरच्या साह्याने चार ते पाच सपासप वार केले.

नाव कमावलं पण वसुलीनं गमावलं; पबमध्ये घुसून वसुली करणे पडले पोलिसाला भारी

या हल्ल्यात जखमी झालेले अमित जयस्वाल यांना तातडीने ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शिवसेना शाखेवर धाव घेतली असून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

कियारा अडवानी की मलायका! जिम लुकमध्ये या 7 पैकी कोणती अभिनेत्री दिसते जास्त हॉट?

दरम्यान, मंगळवारी उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्तांनी भाजपच्या नगरसेवकाला जबर मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सुभाष मरसाळे, हरीश अशोक खेत्रे, महेंद्र रामदास पाटील आणि विनोद हरिचंद्र साळेकर अशी अटकेतील आरोपींची नाव आहे.

'सामना' रंगला, तक्रारी दाखल

दरम्यान, नाशिकमध्ये नाशिक भाजप पदाधिकाऱ्यांनी सामना संपादकांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करून नाशिकमध्ये पोस्टर झळकवले आहे, त्यामुळे तक्रार देण्यात आली आहे.

वेगानं बदलतंय आशियातलं राजकारण, चीन आणि तालिबानची पहिली Diplomatic बैठक

नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रार अर्जावर सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे.  शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये राणेंविरोदात पोस्टर झळकवले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.

First published:

Tags: ठाणे