नवी मुंबई, 28 ऑक्टोबर: कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी नवी मुंबईतील महापालिकेच्या हॉस्पिटलवरच हल्ला केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात तोडफोड करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली. यात रुग्णालयातील व्हेंटिलेटर, डायलिसीसची मशीन, पंखे या साहित्यांची प्रचंड नासधूस केली. तसेच सुरक्षारक्षकास मारहाण करून डॉक्टर आणि नर्स ना धक्काबुक्की देखील केली. मारहाण करणाऱ्या मद्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचं समावेश असून वाशी पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा...1 नोव्हेंबरपासून बदलणार घरगुती गॅस सिलेंडरबाबतचे 4 नियम, वाचा सविस्तर
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी मधील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 48 वर्षीय वेंकटेश सूर्यवंशी या रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला मंगळवारी सायंकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत रुग्णाची कोरोना टेस्ट करण्यात आली होती परंतु त्याचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. रात्री उपचारा दरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी आयसोलेशन वॉर्ड मद्ये जाऊन व्हेंटिलेटर , डायलिसीस ची मशीन ,पंखे अश्या साहित्यांची प्रचंड नासधूस केलेय. तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांकडे चाकू , कट्टा अशी हत्यारे असल्याचे देखील मनपा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर मनपा रुग्णालयात पोलिस चौकीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी आता मनपा रुग्णालयातील नर्सेस करीत आहेत.
या नातेवाईकांना तोडफोड करण्यापासून अडवण्यास गेलेल्या सुरक्षा रक्षकास यांनी बेदम मारहाण केली असून त्याच्यावर मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नातेवाईकांमध्ये काही महिला देखील होत्या ज्यांनी शर्ट फाडत ही मारहाण केली असल्याची प्रतिक्रिया सुरक्षा रक्षकाने व्यक्त केली.
हेही वाचा...कोरोनामुळं ज्या डॉक्टरांचा चेहरा पडला होता काळा, आता अशी झाली अवस्था
या प्रकारामुळे मनपा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून योग्य सुरक्षा पुरवण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे. वाशी पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
काम बंद आंदोलन...
संतप्त जमावानं केलेल्या हल्ल्यात रुग्णालयातील अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यात यापूर्वी देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत.