मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सनातन संस्थेला मुंबई-पु्ण्यामध्ये करायचाय दहशतवादी हल्ला; ATSचा खुलासा

सनातन संस्थेला मुंबई-पु्ण्यामध्ये करायचाय दहशतवादी हल्ला; ATSचा खुलासा

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबईमधल्या नालासोपारा स्फोटक प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबईमधल्या नालासोपारा स्फोटक प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबईमधल्या नालासोपारा स्फोटक प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

मुंबई, 06 डिसेंबर : दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबईमधल्या नालासोपारा स्फोटक प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. हिंदू संघटना सनातन संस्थांना मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करायचे होते असं एटीएसने म्हटलं आहे. एटीएसने नालासोपारा प्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे, ज्यात सनातन संस्थेचा उल्लेख करण्यात आला आहे.

आरोपी सनातन संस्था आणि सहयोगी संस्था 'हिंदू जागृती' आणि इतर संस्था यात सहभागी असल्याचंही एटीएसने म्हटलं आहे. मराठी पुस्तक 'क्षत्र धर्म'मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे ते तथाकथित हिंदू राष्ट्राच्या स्थापनेमुळे प्रेरित झाले आहेत.

तथाकथित हिंदू धर्म, रुढी-परंपरांविरोधात बोलणं किंवा त्याच्याविरोधात लिहिणाऱ्यांना ते लक्ष्य करतात. त्यासाठी ते बंदूक, बॉम्ब याचा उपयोग करतात आणि सर्वसामान्यांना घाबरवतात असं एटीएसने म्हटलं आहे.

डिसेंबर 2017ला पुण्यामध्ये आयोजित वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्ट सनबर्न हादेखील त्यांच्या निशाण्यावर आहे. पण याबद्दल चौकशी केली असता आमचा याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं सनातन प्रवक्ता चेतन राजहंस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आरोपपत्रात शरद कळसकर (25), वैभव राऊत (44), सुधन्वा गोंधळेकर (39), श्रीकांत पांगारकर (40), अविनाश पवार (30), लीलाधर उखिरडे (32), वासुदेव सूर्यवंशी (19), सुजीथ कुमार (37), भारत कुरणे (37), अमोल काळे (34), अमित बड्डी (27) आणि गणेश दशरत मिस्किन (28) यांची नावं आहेत.

सध्या हे सर्वजण न्यायालयाच्या ताब्यात आहेत. त्यांना पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, पुणे, औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. अनधिकृत प्रतिबंध कायदा यूएपीए, स्फोटक द्रव्य कायदा, आयपीसी, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा त्यांच्यावर लादण्यात आला आहे. तर अद्याप 3 ते 4 आरोपी फरार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील नालासोपारा स्फोटक प्रकरणात आरोपी शरद कळसकर याला 14 दिवस पुणे कोर्टात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या चौकशीसाठी शरद कळसकरला सीबीआयने एटीएसच्या ताब्यात दिलं होतं. आता शरद कळसकरला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात येणार आहे.

'मला फक्त एकदा त्यांना हात लावू द्या, ते बरे होतील'; पोलीस पत्नीचा अश्रू आणणारा VIDEO

First published:

Tags: ATS, Maharashtra, Mumbai, Pune, Terrorism, Terrorist