मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा फिर्यादीचा आरोप आहे.

जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा फिर्यादीचा आरोप आहे.

जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा फिर्यादीचा आरोप आहे.

औरंगाबाद, 2 मार्च : औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला गेला. हर्षवर्धन जाधव यांच्या प्लॉटसमोर उभा केलेल्या पान टपरीवरून वाद झाला होता. त्यावेळी जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा फिर्यादीचा आरोप आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. 'हे तर माझ्याविरोधातील राजकीय षडयंत्र आहे. मी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे मला अडकवण्याचा प्रयत्न आहे. मला जेलमध्ये टाकलं तरी मी माझा मुद्दा सोडणार नाही,' असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.

नुकताच केला आहे मनसे प्रवेश

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाअधिवेशन मुंबईत पार पडलं. या अधिवेशनाआधी मनसेमध्ये काही नेते दाखल झाले होते. कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही पुन्हा मनसेची वाट धरली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'कृष्णकुंज'वर हर्षवर्धन जाधव यांनी अधिकृत प्रवेश केला.

हर्षवर्धन जाधव यांची वादग्रस्त राजकीय कारकीर्द

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हर्षवर्धन जाधव यांनी कुणालाच सोडलं नाही. त्यांनी बेफामपणे अनेक नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. नुकतंच त्यांनी सासरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही घर फोडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही जाधव यांच्यावर पैशांसाठी पत्नीला मारहाण करत माहेरी पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता.

हेही वाचा - नवी मुंबई महापालिका निवडणुकीआधी महाविकास आघाडीसाठी खुशखबर

हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय आलेख उतरत्या दिशेने असून त्यांना लोकसभेनंतर विधानसभेतही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या राजकीय जीवनासोबतच व्यक्तिगत जीवनही नेहमीच वादळी ठरलं आहे. अपक्ष, मनसे, शिवसेना, पुन्हा अपक्ष, पुन्हा मनसे असा प्रचंड विस्कळीत राजकीय प्रवास करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी आजपर्यंत अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

First published:
top videos

    Tags: Aaurangabad, Atrocity case, Harshavardhan jadhav