धुळ्यात ATM समजून पासबुक इन्ट्री मशीन चोरट्यांनी लांबवले

धुळ्यात ATM समजून पासबुक इन्ट्री मशीन चोरट्यांनी लांबवले

धुळे जिल्ह्यातील चोरटे सध्या बँकांच्या एटीएमला टार्गेट करीत आहे. धुळे शहरातील साक्री रोड परिसरात एटीएम चोरीचा अपयशी प्रयत्न केल्यानंतर चोरट्यांनी कुसुंबा गावातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या दोन्ही ठिकाणच्या एटीएममधून एकही रुपया चोरीला गेलेला नाही. चोरट्यांचे हे दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

  • Share this:

दीपक बोरसे, (प्रतिनिधी)

धुळे, मे- धुळे जिल्ह्यातील चोरटे सध्या बँकांच्या एटीएमला टार्गेट करीत आहे. धुळे शहरातील साक्री रोड परिसरात एटीएम चोरीचा अपयशी प्रयत्न केल्यानंतर चोरट्यांनी कुसुंबा गावातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या दोन्ही ठिकाणच्या एटीएममधून एकही रुपया चोरीला गेलेला नाही. चोरट्यांचे हे दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

कुसुंबा येथील एटीएम फोडता न आल्याने चोरट्यांनी त्याठिकाणी ठेवलेले पासबुक इन्ट्री मशीनच पळवले. कुसुंबा गावापासून पासून तब्बल एक किलोमीटर अंतरावर ते एका उकीरड्यावर पोलिसांना आढळून आले. विशेष म्हणजे याच काळात धुळे शहरात सोनसाखळी चोरांनी ही अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या चोरटे महिलांच्या अंगावर दागिने ओरबडून नेत आहेत. एकीकडे एटीएम चोरटे तर दुसरीकडे सोनसाखळी चोरांची टोळी नागरिकांना भयभीत करून सोडत असताना पोलिस यंत्रणा मात्र कागद रंगवण्यातच मग्न आहे.

VIDEO : नगरमध्ये 'सैराट' घडलं, 2 महिन्याच्या गर्भवती मुलीसह जावयाला जिवंत पेटवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2019 05:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading