चोरट्यांनी चक्क क्रेनने उचलून नेलं एटीएम, 27 लाख लंपास

चोरट्यांनी चक्क क्रेनने उचलून नेलं एटीएम, 27 लाख लंपास

चोरट्यांनी चक्क क्रेनच्या साहाय्याने आयसीआयसीआय बँकेचं एटीएमच पळवलं आहे. तसंच या एटीममधील 27 लाखांची रोकडही लंपास केली आहे.

  • Share this:

धुळे, 3 नोव्हेंबर : चोरांनी वेगवेगळी शक्कल वापरून केलेल्या अनेक चोऱ्यांबाबात तुम्ही आतापर्यंत वाचलं असेल. पण धुळे शहरात झालेल्या एका चोरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. चोरट्यांनी चक्क क्रेनच्या साहाय्याने आयसीआयसीआय बँकेचं एटीएमच पळवलं आहे. तसंच या एटीममधील 27 लाखांची रोकडही लंपास केली आहे.

शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर असणारे पूर्ण एटीएमच चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रात्री रहदारी कमी झाल्यावर चोरट्यांनी डाव साधला आणि एटीएम पळवून नेलं. सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर या चोरी प्रकरणाची आणि चोरट्यांनी वापरलेल्या अनोख्या शक्कलची आजपासच्या परिसरात मोठी चर्चा रंगत आहे.

याप्रकरणी आता पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असला तरीही अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस स्थानिकांची चौकशी करून चोरांचे काही धागेदोरे हाती लागतायत का, हे पाहत आहेत.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चोरीनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. संपूर्ण एटीएमच जर क्रेनच्या साहाय्याने चोरी केलं जात असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचं काय, असा सवाल आता शहरातील नागरीक करत आहेत.

 VIDEO : सरकारचा निषेध करण्यासाठी बच्चू कडू समर्थकांनी पेटवली बैलगाडी

First published: November 3, 2018, 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading