पिंपरी : पैसे नसल्याने एटीएमवर घातला दगड

पिंपरी : पैसे नसल्याने एटीएमवर घातला दगड

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमची स्क्रिन पेव्हर ब्लॉकने तोडण्यात आली

  • Share this:

10 एप्रिल : एटीएममध्ये पैसे नसल्याने पिंपरीत एटीएमची तोडफोड केल्याची घटना घडलीये. पेव्हर ब्लॉकने एटीएम मशिनची स्क्रिन फोडण्यात आली आहे.

नोटाबंदीनंतर देशभरात तीव्र नोटाटंचाईचा सर्वांनाच सामना करावा लागला. शहरीभागात एटीएममध्ये खडखडाट पाहण्यास मिळाला. दर महिन्याला पगार झाल्यानंतर नोकरदार वर्ग एटीएमकडे वळतो. मात्र,  एटीएममध्ये खडखडाट पाहण्यास मिळतोय. एटीएममध्ये पैसे नसलेल्यामुळे संतापलेल्या अज्ञात ग्राहकाने एटीएमवरच दगड घातलाय.  पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमची स्क्रिन पेव्हर ब्लॉकने तोडण्यात आल्याचं समोर आलंय. ग्राहकांना अनेकदा या एटीएममधून पैसेच मिळायचे नाहीत. त्याच रागातून एखाद्या संतप्त नागरिकाने हे कृत्य केले असावं, असा संशय परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 05:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading