Home /News /maharashtra /

जुळ्या मुली झाल्या म्हणून रथातून काढली मिरवणूक!

जुळ्या मुली झाल्या म्हणून रथातून काढली मिरवणूक!

सांगलीत जुळ्या मुलींच्या जन्माचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय. जुळया मुली झाल्या म्हणून मुलींना रथामध्ये बसवून शाही मिरवणूक काढत आनंद साजरा केलाय.

सांगली, 05 जून : एका बाजूला मुलींना नाकारण्याच्या घटना समोर येत असताना समाजाला आदर्श घालून देणारी घटना सांगलीय घडलीय. सांगलीत जुळ्या मुलींच्या जन्माचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय. जुळ्या मुली झाल्या म्हणून मुलींना रथामध्ये बसवून शाही  मिरवणूक काढत आनंद साजरा केलाय. मिरज तालुक्यातील सुभाष नगरमध्ये राहणाऱ्या अभिजीत आणि रूपाली गायकवाड या दाम्पत्याला 21 जानेवारी 2018 रोजी जुळ्या मुली झाल्या. त्यानंतर त्यांचा नामकरण सोहळा पार पडला.आज या मुलींना त्यांच्या आजोळातून वडिलांच्या घरी आणण्यात आलं. यावेळी गायवाग कुटुंबानं रथामधून वाद्यांच्या गजरात या मुलींची मिरवणूक काढत आनंदात स्वागत केलंय. अशा प्रकारे कन्यारत्नांचं स्वागत करत गायकवाड  कुटुंबानं समाजासमोर एक आर्दश घालून दिलाय.
First published:

Tags: Celebration, Sangali, Tween girl, जुळ्या मुली, रथातून मिरवणूक, सांगली

पुढील बातम्या