महाराजबागेतल्या जाई वाघिणीच्या किडन्या सर्पदंशानं निकामी

महाराजबागेतल्या जाई वाघिणीच्या किडन्या सर्पदंशानं निकामी

महाराजबागेत अनेक विषारी सापांचा मुक्त संचार आहे. आतापर्यंत इथल्या प्राण्यांना साप चावल्याची घटना घडली नव्हती. पण जाईला सर्पदंश झाल्यानं नवाच प्रश्न प्राणीसंग्रहालय प्रशासनासमोर उभा ठाकलाय.

  • Share this:

नागपूर, 27 नोव्हेंबर : नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयातल्या जाई नावाच्या वाघिणीला साप चावलाय. सर्पदंशामुळे जाईच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात. प्राणीसंग्रहालयातले डॉक्टर वाघिणीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत.

जाई वाघीण नऊ वर्षांची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती या संग्रहालयात आहे. महाराजबागेत अनेक विषारी सापांचा मुक्त संचार आहे. आतापर्यंत इथल्या प्राण्यांना साप चावल्याची घटना घडली नव्हती. पण जाईला सर्पदंश झाल्यानं नवाच प्रश्न प्राणीसंग्रहालय प्रशासनासमोर उभा ठाकलाय.

या महाराजबागेत जवळजवळ 300हून जास्त प्राणी आहेत. त्यात वाघ, हरणं, अस्वलं, नील गायी, मोर, माकडं आणि अनेक पक्षी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 06:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading