कोल्हापुरात भरलंय 'लय भारी' कृषी प्रदर्शन

कोल्हापुरात भरलंय 'लय भारी' कृषी प्रदर्शन

300 किलो वजनाचे डुक्कर, 40 लीटर दूध देणारी गाय, 1 टन वजनाचा रेडा, रोज 4 लिटर दूध देणारी शेळी. ऐकून नवल वाटलं ना. पण हे सगळं खरं आहे आणि यासाठी तुम्हाला जावं लागेल कोल्हापूरला.

  • Share this:

कोल्हापूर, 04 डिसेंबर : 300 किलो वजनाचे डुक्कर, 40 लीटर दूध देणारी गाय, 1 टन वजनाचा रेडा, रोज 4 लिटर दूध देणारी शेळी. ऐकून नवल वाटलं ना. पण हे सगळं खरं आहे आणि यासाठी तुम्हाला जावं लागेल कोल्हापूरला.कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या वतीनं एक कृषी प्रदर्शन भरलंय आणि त्या निमित्तानं कोल्हापूरकरांना जगात भारी अशी जनावरं पाहण्याची संधी मिळालीय.

या कृषी प्रदर्शनामध्ये 30 किलो वजन असलेली डुकरं आणण्यात आलीत. ज्याचं मटण थेट घरपोचही होऊ शकतं आणि ही डुकरं फक्त गवत आणि चाऱ्यावरच  वाढ झालेली आहेत. तर रोज 40 लिटर दूध देणारी गाय आणि रोज 4 लिटर दूध देणारी शेळीही या प्रदर्शनामध्ये आहे.

पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरत कोल्हापूरसह राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी शेळीपालन, कुकुटपालन करत जगावेगळी जनावरं पाळली आहेत आणि त्यातून मोठा आर्थिक फायदा या शेतकऱ्यांना होतोय.

या प्रदर्शनात 1 टन वजन असेलला रेडाही आहे. जो सगळ्यांचं आकर्षण ठरलाय. ही जगावेगळी जनावरं पाहण्यासाठी कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातूनही  शेतकरी आणि नागरिक येत आहेत. या जनावरांच्या प्रदर्शनासोबतच इथं शेतीची अवजारं, विविध तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे स्टॉल्सही मांडण्यात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 05:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading