धामणे गावात बेपत्ता मुलीचा मृतदेह जंगलात सापडला, तपास सुरू

धामणे गावात बेपत्ता मुलीचा मृतदेह जंगलात सापडला, तपास सुरू

मुलीचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या अंगावर कपडे नव्हते. हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय आहे. दगडानं ठेचून तिचा चेहराही विद्रूप करण्यात आला होता.

  • Share this:

04 डिसेंबर : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीची हत्या झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातल्या चाकणजवळच्या धामणे गावात उघडकीस आलीये. हत्या झालेली मुलगी चार दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह गावाजवळच्या जंगलात सापडला. मुलीचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या अंगावर कपडे नव्हते. हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय आहे. दगडानं ठेचून तिचा चेहराही विद्रूप करण्यात आला होता. या घटनेमुळं मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

खेड तालुक्यातील पश्चिम भागातील धामणे गाव याच गावातील कोळेकर कुटुंब शेती करून आपला उदरर्निवाह करत आहे. कांताराम कोळेकर यांची मुलगी कोमल ही चार दिवसांपासून बेपत्ता होती. गावातील नागरिकांनी शोध घेतला असताना मुलीचा मृतदेह गावाच्या बाजूच्या जंगल परिसरातील शेतात नग्न वस्थेत  आढळला.

कोपर्डी घटनेचा निकाल लागला आणि सर्वत्र न्यायालयाच्या न्यायाचे स्वागत झाले, मात्र माझ्या बहिणीची ही अशी अवस्था करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी व तपास वेगात करावा असे मुलीचा भाऊ प्रशांत कोळेकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 04:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading