चंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून!

चंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून!

या वृद्धाचे मानसिक संतुलन बिघडले असून हा कपडे घातल्यावर काढून टाकत. नग्न होऊन फिरत असल्याने त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी वृद्धांचे पाय बांधून त्याला बाहेर टाकून दिले होते.

  • Share this:

22 एप्रिल : माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचं एक उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यात पहायला मिळालंय. चंद्रपुरात वृद्धाला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील महाकाली कॉलरी भागातील या घटनेने खळबळ उडाली आहे. ४६ डिग्री तापमानात या वृद्धाला पाय बांधून चक्क जमिनीवर उन्हात टाकले होते. अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्याची सुटका करण्यात आली.

या वृद्धाचे मानसिक संतुलन बिघडले असून हा कपडे घातल्यावर काढून टाकत. नग्न होऊन फिरत असल्याने त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी वृद्धांचे पाय बांधून त्याला बाहेर टाकून दिले होते. या अमानवीय प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी हस्तक्षेप करून कुटुंबाशी बोलून यातील तथ्य जाणून घेतले.

दरम्यान खाण्यासाठी काहीही दिले जात नसल्याने त्याला माती खावी लागत असल्याचे उघड झाले. अखेर पोलिसांनी त्याचे बांधलेले पाय मोकळे करून त्याची सुटका केली आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने खाऊ घातले.

अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात ८० वर्षाच्या या वृद्धाला अशा प्रकारे पाय बांधून ठेवण्याच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या पुढाकाराने या वृद्धाचे जगणे सुसह्य होणार आहे.

First published: April 22, 2018, 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading