लेकच बनली माय, चिमुकली अंजली घेतेय भाजलेल्या आईची काळजी

लेकच बनली माय, चिमुकली अंजली घेतेय भाजलेल्या आईची काळजी

आई-वडिलांची सेवा करणारा बाळ म्हटलं की आपल्याला श्रावणबाळ आठवतो. मात्र एक चिमुकली सु्ध्दा श्रावणबाळ होऊ शकते हे या अंजलीने दाखवून दिले आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 21 मार्च : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. समर्थ रामदासांनी सुंदर श्लोक जगाला दिला. या श्लोकाच्या चार शब्दात आपल्या आयुष्यात आईचे महती त्यांनी सांगितली. अनेक व्यक्ती आईला जीवापाड जपतात, काळजी घेतात याचे उत्तम उदाहरण औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात पहायला मिळते आहे.

आई-वडिलांची सेवा करणारा बाळ म्हटलं की आपल्याला श्रावणबाळ आठवतो. मात्र एक चिमुकली सु्ध्दा श्रावणबाळ होऊ शकते हे या अंजलीने दाखवून दिले आहे.

अंजलीच्या आईने स्वत:ला घरगुती कारणामुळे पेटवून घेतले. त्यात ती पन्नास टक्के भाजली.गेल्या चार महिन्यांपासून तिच्यावर उपचार करून घाटी रूग्णालयाने तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. अंजलीच्या आईला तिच्या नातेवाईकांनी वाळीत टाकलं. त्यामुळे आईची वेणी घालण्यापासून सर्व कामे हि चिमुकली अंजली करतेय.

First published: March 21, 2018, 2:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading