जाचाला कंटाळून पत्नीनंच केला पतीचा खून

जाचाला कंटाळून पत्नीनंच केला पतीचा खून

हरिश्‍चंद्र कोळी असे मृताचे नाव असून त्‍याची पत्‍नी यमुना हिच्‍या विरोधात अलिबाग पोलीसांनी गुन्‍हा दाखल करून तिला ताब्‍यात घेतले आहे.

  • Share this:

अलिबाग, 25 आॅक्टोबर : नवऱ्याच्‍या सततच्‍या जाचाला कंटाळून पत्‍नीने  पतीचा साडीने गळा आवळून खून केल्‍याचा प्रकार अलिबाग तालुक्‍यातील थळ कोळीवाडा इथे भाऊबीजेच्‍या दिवशी घडली . पत्‍नीने स्‍वतः गुन्ह्याची कबुली दिल्‍यानंतर हा धक्‍कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला.  हरिश्‍चंद्र कोळी असे मृताचे नाव असून त्‍याची पत्‍नी यमुना हिच्‍या विरोधात अलिबाग पोलीसांनी गुन्‍हा दाखल करून तिला ताब्‍यात घेतले आहे.

यमुनाचा नवरा  दारू पिऊन सतत त्रास देत असे. तसेच कोणतेही काम करत नव्‍हता . उलट तिने कमवलेल्‍या पैशावर नशापाणी करत असे . यामुळे यमुना वैतागली होती. 21 तारखेच्‍या रात्री घरातून गायब झालेल्‍या 70 हजार रूपयावरून  दोघांमध्‍ये जोरदार भांडण व झटापट झाली . यात हरिश्‍चंद्र खाली पडून जखमी झाला . ही संधी साधत यमुनाने साडीचा फास त्‍याच्‍या गळ्याभोवती आवळत त्‍याचा जीव घेतला. त्‍

यानंतर त्‍याचे प्रेत स्‍वतःच खेचत मागील बाजूस खोदलेल्‍या खड्ड्यात पुरले.  दोन दिवसांनी तिला केल्‍या प्रकाराचा पश्‍चात्ताप झाला आणि तिनं स्वतःच अलिबाग पोलीस ठाणे गाठलं आणि घडल्‍या प्रकाराची कबुली दिली.

First published: October 25, 2017, 9:47 AM IST

ताज्या बातम्या