जुलमी राजवटीला ही चपराक - राज ठाकरे

जुलमी राजवटीला ही चपराक - राज ठाकरे

जुलमी राजवटीला ही चपराक अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : जुलमी राजवटीला ही चपराक अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्यांदा होमग्राऊंडमध्ये जागा दाखवणारे हे गुजरात राज्य होतं. त्या निवडणुकीत झालेले मतदान आणि आता झालेल्या मतदानावरून भाजपला त्यांची जागा समजली आहे. गुजरातमध्ये 165 जागा येणे गरजेचं होतं पण तिथे 99 जागा आल्या.  उर्जित पटेल यांनी कुठल्या तरी मोठ्या धोक्याच्या आधी राजीनामा दिला असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

काय म्हणाले राज ठाकरे

- पांडुरंग फु्ंडकर गेले तेव्हा पासून राज्याला कृषिमंत्री नाही

- शेती आणि दुष्काळाचं गांभीर्य पाहून वेगळा कृषिमंत्री हवा आहे पण या सरकाराला काही घेणे नाही. त्यांनी चंद्रकांत पाटलांकडे अतिरिक्त कारभार सोपवला

- राज्य सरकाराला दुष्काळाचं गांभीर्य नाही

- या देशाला रामराज्याची गरज आहे राम मंदिराची गरज नाही

- लोकांसमोर जाणार कसे यासाठी भाजपने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे

- काँग्रेसच्या बाजूने जो काही कौल दिला आहे तो मान्य करावे लागेल

- गुजरातमध्ये राहुल गांधी एकटे होते.

- कर्नाटकामध्ये राहुल गांधी एकटे होते तरी काँग्रेसचा विजय झाला

- पप्पू म्हणून त्यांना हिणावत होते. आता पप्पूचा परमपुज्य झाला.

- राहुल गांधींच्या नेतृत्त्वाला जनतेनं दिलेला हा कौल होता.

- राहुल गांधींच्या नेतृत्त्वाला जनतेनं दिलेला हा कौल होता.

- जनतेचं मी अभिनंदन देतो आणि त्यांनी नवा पायंडा पाडला.

 VIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडली

 

First published: December 11, 2018, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading