Home /News /maharashtra /

खान्देशात भाजपच्या गडाला हादरे सुरूच, अस्मिता पाटील यांनी ठोकला रामराम

खान्देशात भाजपच्या गडाला हादरे सुरूच, अस्मिता पाटील यांनी ठोकला रामराम

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

    जळगाव, 25 डिसेंबर : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर भाजपला गळती लागली आहे. खडसे यांच्यापाठोपाठ भाजप आमदार आणि नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच जळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील  (Asmita Patil) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. अस्मिता पाटील या भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या सदस्या देखील होत्या. आपण वैयक्तिक कारणासाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे अस्मिता पाटील यांनी सांगितले आहे. CCTV : इंंडिकेटर न देताच गाडी वळवली; Activa वरुन येणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू अस्मिता पाटील या भाजपमध्ये येण्याआधी राष्ट्रवादी पक्षात होत्या. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यामुळे भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे अस्मिता पाटील या पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर अस्मिता पाटील या राष्ट्रवादी दाखल झाल्या नाहीतर शिवसेनेत सुद्धा प्रवेश करू शकता, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. भाजपचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर? दरम्यान, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता थेट विद्यमान आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रवेश सोहळ्यात  भाजपमधील दोन मोठ्या नेत्यांचा सुद्धा समावेश असल्याचे बोलले जात आहे. MNS आणि Amazon आमने-सामने; कोर्टाने मनसेला दिला आदेश काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आणि नवाब मलिक यांनी  भाजपमध्ये गेलेले काही आमदारांची पुन्हा घरवापसी होणार आहे, असे संकेत दिले होते. त्यानुसार आता काही आमदार आणि नेते हे परत राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. Covid-19 लशीबाबत चिंता वाढवणारी बातमी! अ‍ॅलर्जीचे प्रकार आले समोर विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांचा 11 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. दरवर्षी वाढदिवसाच्यानिमित्त ते वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देत असतात.  यंदाही जाहिरात देण्यात आली आहे पण या जाहिरातींमधून भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोच गायब आहे. महाजनांचा फोटोच प्रसिद्ध करण्यात आला नाही.मात्र, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा फोटो जाहिरातींमध्ये असल्याने भाजप आमदार संजय सावकारे खडसे यांच्या पाठोपाठ हातात घड्याळ बांधून घरवापसी करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या