मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आधी तक्रार केली नंतर 1 लाखांची खंडणी मागितली, RTI कार्यकर्त्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

आधी तक्रार केली नंतर 1 लाखांची खंडणी मागितली, RTI कार्यकर्त्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

 विलास पाटील याने यापूर्वी  विकास आढाव यांच्याविरुद्ध तहसील कार्यालयात तक्रार दिली होती.

विलास पाटील याने यापूर्वी विकास आढाव यांच्याविरुद्ध तहसील कार्यालयात तक्रार दिली होती.

विलास पाटील याने यापूर्वी विकास आढाव यांच्याविरुद्ध तहसील कार्यालयात तक्रार दिली होती.

नांदेड, 14 डिसेंबर :  बिल्डींग मटेरीयल सप्लायरला (Building Material Supplier) 1 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला (RTI activist) पोलिसांनी खंडणीच्या रक्कमेसह  रंगेहाथ पकडल्याची घटना नांदेडमध्ये (nanded) घडली आहे. या आरटीआय कार्यकर्त्याने खोटी तक्रार दाखल करून खंडणी मागितली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्ता आणि भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा अध्यक्ष विलास पांडुरंग घोरबांड पाटील असं आरोपीचे नाव आहे. या आरोपीला आज 50 हजारांची खंडणी घेतांना पोलिसांनी सापळा लावून रंगेहात पकडले आहे. नांदेड शरातील  विकासनगर कौठा येथे राहणारे बिल्डींग मटेरियल सप्लायर विकास मोहनराव आढाव यांनी पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती.

विलास पाटील याने यापूर्वी  विकास आढाव यांच्याविरुद्ध तहसील कार्यालयात तक्रार दिली होती. परवानगी नसताना आढाव हे अवैध मुरूम उत्खनन करत असल्याची तक्रार होती. आढाव यांनी खोदलेले गौण खनीज मुरूम याची मोजणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे त्या खदानीची ईटीएस मोजणी झाली. नंतर मात्र विलास घोरबांड याने आढाव यांना पैश्याची मागणी केली. मागील चार ते पाच महिन्यांपासून त्याने सातत्याने खंडणीची मागणी केली.

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या मंचावर दीपा-कार्तिकची झाली पोलखोल

तहसील कार्यालयात दिलेला अर्ज परत घेण्यासाठी 1 लाख रुपये खंडणी त्याने मागितली. विकास आढावने विलास घोरबांड पाटलांना सांगितले की, 'माझे मुरूम खोदणीचे काम कायदेशीर आहे. तेंव्हा विलास घोरबांड पाटलांनी मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. आणि भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा अध्यक्ष आहे. माहिती अधिकाराखाली तुमच्याविरुद्ध दुसरा अर्ज देवून माहिती मागवतो असे म्हणून खोटे अर्ज करून विकास मोहनराव आढाव यांच्या कामात व्यत्यय आणणे सुरू केले.

रुपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्याचं कारण आलं समोर, मनगटावर 'घड्याळ' बांधणार?

त्यामुळे विकास आढाव यांनी पोलिसांकडे रितसर तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचला आणि विकास आढाव यांना पैसे घेऊन पाठवले. तत्पुर्वी 1 लाख रुपये खंडणीमधील पहिला हप्ता आज 50 हजार रुपये आणि उर्वरीत 50 हजारांचा दुसरा हप्ता एक ते दीड महिन्यात देण्याचे ठरलेले होते. आज दुपारी डॉ.आंबेडकर चौक, लातूर फाटा येथे विकास आढाव यांच्याकडून विलास पाटील यांने पैसे स्वीकारले आणि त्याचवेळी  पोलिसांच्या त्याला पकडले.

First published: