बीड, 01 मे : 'बीड (Beed) जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्र्यांनी अधिक लक्ष देणं गरजेचं होतं. पण उशिरा का होईना त्यांना कोविड परिस्थितीवर जाग आली आहे. आता त्यांनी केंद्राकडे लशीसाठी विचारणा करावी, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना लगावला आहे.
महाराष्ट्र दिना निमित्त राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण संपन्न झाला. यानंतर ते माध्यमांशी बोलत असताना लसीकरणावर आपली भूमिका मांडली.
भारतरत्न लता मंगेशकर यांनी दिली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाखांची मदत
'आपल्या जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्र्यांनी अधिक लक्ष देणं गरजेचं होतं. पण उशिरा का होईना त्यांना कोविड परिस्थितीवर जाग आली, आता उशिरा का जाग आली असं म्हणता येत नाही. त्यांनी ज्या सूचना केल्या त्याची अधिक काळजी घेऊ. मात्र, आपणही केंद्रामध्ये सत्तेत आहात. त्यामुळे बीड जिल्ह्याला अधिक लसी कशा मिळतील यासाठी त्यांना जाग येणं आवश्यक असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
प्रिया मराठेनं कोरोना रुग्णांना दिली प्रेरणा; Videoवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काही दिवसांपूर्वी '1 मे रोजी सेकंड डोस उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे. तो शब्द शासनाने जनतेला दिला आहे, तो पाळलाच पाहिजे. केवळ केंद्र शासनाच्यावर जबाबदारी टाकून जमणार नाही. राज्याचे लसीकरण आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचे ऑडिट आणि दररोज मााहिती दिली पाहिजे. जास्तीत जास्त लसीकरण केंद्र कमीतकमी अवधी हे सूत्र करावे लागेल. लसींच्या उत्पादन करणे, साठा बनवणे,तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे लागेल, अशी सूचना पंकजा मुंडे यांनी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.