अश्विनी बिद्रेंनंतर त्यांच्या पतीच्याही जीवाला धोका, 5वीत शिकणाऱ्या लेकीनं मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

अश्विनी बिद्रेंनंतर त्यांच्या पतीच्याही जीवाला धोका, 5वीत शिकणाऱ्या लेकीनं मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

‘मला बोलायचं आहे, ऐकाल ना…’, अश्विनी बिद्रे यांच्या पाचवीत शिकणाऱ्या लेकीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं मन सुन्न करणारं पत्र.

  • Share this:

कोल्हापूर, 17 फेब्रुवारी : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली असली तरी अद्याप या प्रकरणी कोणालाही शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही. आता या प्रकरणाच्या तपासासाठी मदत व्हावी म्हणून बिद्रे यांच्या पाचवीत शिकणाऱ्या मुलीने मुख्यमंत्र्याना पत्र लिहिले आहे.

अश्विन बिद्रे यांच्या हत्येनंतर आरोपींना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यामुळं अद्याप या प्रकरणाचा काहीच निकाल लागलेला नाही. काही दिवसांपूर्वी या प्रकरणाला एक वेगळे वळण आले होते. प्रकरणाची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात सुरू असताना न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्याकडे असलेला खटला आता न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या न्यायालयात चालणार आहे. आता अश्विनी बिद्रे यांची इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी सिध्दी गोरे या लेकीनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

वाचा-भाजप नेत्यांना सत्तेचा आजार, रात्रीही पडतं खुर्चीच स्वप्न; राष्ट्रवादीचा घणाघात

वाचा-इंदुरीकर महाराज कायदेशीररित्या बाजू मांडणार, भक्त मंडळींना केलं आवाहन

सिध्दीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, आईचा मृतदेह शोधून मिळाला पण या तपासासाठी वडील राजू गोरे यांनाही सतत न्यायालयाच्या कामासाठी मुंबईला जावे लागत आहे त्यामुळे तेही भेटत नसल्याची तक्रार केली आहे. वडीलांच्या जीवालाही धोका असल्याचे तिने या पत्रात म्हटलं आहे.

वाचा-लष्करातल्या महिलांसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, केंद्राला फटकारलं

काय आहे प्रकरण

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील होत्या. एमपीएससीची परीक्षा देऊन अश्विनी या महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्या 2006 साली. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. नोकरी लागल्यावर त्यांनी पुणे, नवी मुंबई, सांगली या भागात नोकरी बजावली. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी पतीशी संबंध तोडले आणि परस्पर प्रपंच थाटला. पण त्यानंतर बिद्रे या बेपत्ता होत्या. त्यानंतर पोलीस तपासात त्यांची हत्या झाल्याचं समोर आले होते. अश्विनी बिद्रे यांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. शरीराचे तुकडे एका पिशवीत भरून वसईतील खाडीत टाकून देऊन विल्हेवाट लावली. अश्विनी बिद्रे प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ राजेश पाटील याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राजेश हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे.

First published: February 17, 2020, 1:22 PM IST

ताज्या बातम्या